Join us

नायिकांनी आणला कपड्यांचा नवा ट्रेंड

By admin | Updated: October 17, 2015 01:55 IST

जगात भारतीय पारंपरिक वेष हा नेहमीच हटके आणि सुंदर दिसतो. कोणताही ड्रेस अगदी सहजरित्या अंगावर मिरवता येईल असाच असतो. मग तो लहेंगा, साडी, कुर्ता किंवा सलवार-कमीज काहीही असो.

जगात भारतीय पारंपरिक वेष हा नेहमीच हटके आणि सुंदर दिसतो. कोणताही ड्रेस अगदी सहजरित्या अंगावर मिरवता येईल असाच असतो. मग तो लहेंगा, साडी, कुर्ता किंवा सलवार-कमीज काहीही असो. सण-उत्सवाचे दिवस आल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे ही इच्छा असतेच. दागिने, आभूषणांनी नटण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. भारतीय वधू तर अशा दागिन्यांनी जणू मढलेलीच असते. सध्या नवरात्र सुरू आहे. दिवाळीही लवकरच येणार आहे. त्यामुळे शॉपिंगसाठी बऱ्याच मुली उत्सुक असतील. बॉलिवूडकडे बघूनच बऱ्याच वेळेस भारतीय पारंपरिक वेषभूषेत बदल होत असतात. म्हणूनच सध्या बाजारात नवीन काय आले आहे, कोणता ट्रेंड अथवा फॅशन जोरात आहे, यावर एक नजर...>> माधुरीचा भरजरी लहेंगा ‘हम आपके है कौन’ चित्रपटात माधुरीने सलमान खानसोबत हिरव्या रंगाचा लहेंगा परिधान करुन ‘दिदी तेरा देवर दिवाना’ या गाण्यात केलेली धूम साऱ्यांनाच आठवत असेल. हा चित्रपट आणि हे गाणं खूप गाजलं. लग्नात त्याकाळी प्रत्येक ठिकाणी हे गाणं वाजत होतं. ‘देवदास’ या चित्रपटात माधुरीने परिधान केलेल्या भरजरी वेषाने साऱ्यांचीच हृदये जिंकून घेतली होती. ‘आजा नचले’ चित्रपटातील तिचा काळ्या रंगाचा निळी किनार असलेला लहेंगा इतका गाजला की तो खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली.>>काजोलचा पंजाबी लूक‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’मधील काजोलचा हिरव्या रंगाचा लहेंगा आजही तरुणींना आकर्षित करीत असतो. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यावेळी काजोलने घातलेल्या ड्रेसची प्रत्येक मुलगी मागणी करू लागली. काही वर्षानंतर तिने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात असाच भरजरी लहेंगा परिधान केला. तिने घातलेल्या लहेंग्यामुळे ती खूपच आकर्षक दिसली होती.>>करिनाची शरारा स्टाईल‘कभी खुशी कभी गम’मध्ये चुलबुली करिना कपूर ‘बोले चुडियाँ’ गाण्यावर नाचताना आपण पाहिली असेल. या गाण्यात तिने घातलेला जो लहेंगा आहे, हा मनीष मल्होत्राने डिझाईन केलाय. त्यामुळे ती आकर्षक तर दिसलीच आहे किंबहुना तिने या गाण्यात बाजीही मारलीय. जेव्हा हा चित्रपट पडद्यावर आला आणि ब्लॉकबस्टर झाला, त्यावेळी अगदी तशाच पद्धतीच्या शराराला सर्वत्र मागणी आली. अजूनही तो करिनाचा लहेंगा डिमांडमध्ये आहे.>>दीपिकाची अर्धी साडीदीपिका फॅशनच्या बाबतीत अगदीच दक्ष असते. ती जे काही परिधान करते ते इतरांपेक्षा वेगळं आणि एकमेव असतं. त्यामुळे तिची कपड्यांची चॉईसही वेगळी आणि ट्रेंड सेट करणारी असते. ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये तिने अर्धी साडी परिधान केली आहे. दाक्षिणात्य पद्धतीची ती साडी इतकी लोकांना आवडली की ती फॅशन ‘फॉलो’ करण्याकडे अनेकांचा कल होता. ‘राम लीला’ चित्रपटात लहेंगा, लांब गोलाकार स्कर्ट आकर्षित करणारा होता. >>सुष्मिताची मै हंू ना स्टाईलशिक्षिका घालतात त्यापेक्षा वेगळी साडी नेसत सुष्मिताने नवा ट्रेंड निर्माण केला. मै हंू ना चित्रपटात शाहरुख खान जेव्हा प्रथम वर्गात येतो, त्यावेळी सुष्मिताने घातलेली लाल रंगाची साडी पाहताच तो भान हरखून तिच्याकडे पाहू लागतो. आताच्या मॉडर्न शिक्षिकांना तिची साडी खूप पसंत पडली. प्रत्येक विद्यार्थ्याला अशी फॅशनेबल शिक्षिका असावी असेच वाटत असणार. बॉलिवूडमधील असे ड्रेस लोकप्रिय होतात, नवे ट्रेंड निर्माण करतात. येत्या काही दिवसात तुम्ही जेव्हा बाहेर पडाल आणि असे ड्रेस घातलेल्या महिला, मुली दिसतील त्यावेळी आश्चर्य वाटायला नको.