पुणे : ‘मुंबई-पुणे-मुंबई’मुळे माझ्या आयुष्याचा एक नवा प्रवास सुरू झाला. अभिनेता म्हणून रसिकांच्या मनात माझी एक ओळख निर्माण झाली, असे मत अभिनेता स्वप्निल जोशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. त्याचा ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ लग्नाला यायचेच हा सिनेमा १२ नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने त्याने मनातील काही गोष्टी उघड केल्या. मला असं वाटते की काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या असतात. सतीशने जेव्हा आम्हाला मुंबई- पुणे- मुंबई १ ची गोष्ट ऐकवली, तेव्हा प्रत्येक बाबतीत सगळेच नवीन होते. सतीश आणि मुक्तासारखे अत्यंत सुंदर आणि जिवलग मित्र आयुष्यभरासाठी मिळाले. गौतमसारखा एक रोल मला निभावता आला. गौरीसारख्या एका कॅरेक्टरची साथ मला मिळाली आणि गौतम -गौरीची जोडी मराठी माणसाने अगदी डोक्यावर घेतली. त्याचा अभिमान, मराठी संस्कृती, पुणेरी संस्कृतीबद्दल त्याला असलेली ओढ सगळेच फार माझे आहे. (प्रतिनिधी)‘मुंबई-पुणे-मुंबई’ने आम्हाला प्रेम दिले, अभिनेता म्हणून ओळख, मानसन्मान तर दिलाच; पण त्याहूनही अधिक प्रत्येक मराठी रसिकाच्या मनात कायमस्वरूपी स्थान दिले. आता ‘मुंबई पुणे मुंबई- २, लग्नाला यायचंच’ येतोय, मला वाटते की मुंबई-पुणे-मुंबई १ चे लॉजिक आणि मजा जास्त द्विगुणित करणारा हा सिनेमा आहे. तर मग येत्या १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या शुभमुहूर्तावरील महाराष्ट्रातील या लाडक्या लग्नाला यायचंच!
आयुष्याचा नवा प्रवास
By admin | Updated: November 9, 2015 01:50 IST