Join us

नेहा पेंडसेचा हा बिकनी लूक पाहून, फॅन्सही झाले क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:41 IST

नेहा पेंडसे ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती.

अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. लग्नानंतर नेहा तिचे खासगी आयुष्य एन्जॉय करते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याचे नेहा सांगते. आता मला माझे घर आहे. पण नवऱ्यासोबत माझे घर ही गोष्ट खूप वेगळी आहे. नवऱ्यासोबत असता तेव्हा तुम्ही जबाबदार बनता आणि मी जबाबदार झाले आहे. नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. 

नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. या फोटोत तिने बिकीनी घातल्याचे पाहायला मिळत आहे. 

नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षा वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते.

वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या व्हिडीओला बऱ्याच कमेंट्स आणि लाईक्सही मिळाल्या होत्या. तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.

टॅग्स :नेहा पेंडसे