Join us

हेअरस्टाईलसाठी नेहाचे प्रयत्न

By admin | Updated: October 21, 2016 03:41 IST

अभिनेत्री म्हटले, की सौंदर्य हे आलेच. या सौंदर्यासाठी अभिनेत्रींना अपडेट राहणे फारच महत्त्वाचे असते. तसेच आपला ड्रेस, हेअरस्टाइल या गोष्टींना अधिक महत्त्व

अभिनेत्री म्हटले, की सौंदर्य हे आलेच. या सौंदर्यासाठी अभिनेत्रींना अपडेट राहणे फारच महत्त्वाचे असते. तसेच आपला ड्रेस, हेअरस्टाइल या गोष्टींना अधिक महत्त्व देताना या अभिनेत्री दिसत असतात. कारण केसांमुळे मुलींचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, असे मानले जाते. म्हणूनच वन वे तिकीट, कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नेहा महाजन हिने आपल्या सौंदर्यासाठी हेअरस्टाइलवर प्रचंड मेहनत घेतली आहे. नुकताच नेहाने सोशल मीडियावर हेअर स्टाइल करतानाचा फोटो अपलोड केला आहे. या फोटोद्वारे नेहा सांगते, कर्ली केस करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. नेहाचे हे प्रयत्न पाहता तिची ही कर्ली हेअरस्टाइल नक्कीच तिच्या सौंदर्यात भर पाडेल, अशी आशा करुया. नेहा सध्या वन वे तिकीट या चित्रपटाच्या प्रिमीअर शोसाठी सिंगापूरमध्ये असल्याचे समजत आहे. बहुतेक सिंगापूरच्या प्रेक्षकांची मने जिंकण्याचा हा प्रयत्न आहे.