Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा बनणार निर्माती

By admin | Updated: September 24, 2014 06:29 IST

प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया आता निर्माती बनण्याच्या तयारीत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया आता निर्माती बनण्याच्या तयारीत आहे. बॉलीवूडमधील इतर अभिनेत्रींप्रमाणे आता नेहानेही निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरवले आहे. नेहा याबाबत म्हणाली की, मला नेहमीच चित्रपटांच्या निर्मितीत रस होता. भविष्यात मी चित्रपट निर्मितीत हात अजमावण्याचा विचार करीत आहे. मला चित्रपट बनवायचे आहेत.’ यापूर्वी लारा दत्त, पूजा भट्ट, शिल्पा शेट्टी, दिया मिर्झा, जुही चावला, प्रीती झिंटा आणि प्रियंका चोप्रासारख्या अभिनेत्री चित्रपट निर्मितीत सक्रिय आहेत. नेहाचा इक्कीस तोफो की सलामी हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटात ती एका नवोदित अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल.