Join us  

आता सीन पालटणार! 'नो फिल्टर नेहा'चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 1:26 PM

लोकप्रिय पॉडकास्ट 'नो फिल्टर नेहा'चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री नेहा धुपियाबॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिचा  लोकप्रिय पॉडकास्ट 'नो फिल्टर नेहा'चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, यात एक विशेष बाब आहे. ती म्हणजे हा बहुप्रतिक्षित सहावा सीझन व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असणार आहे. 

नेहा धुपियाचा 'नो फिल्टर नेहा' हा शो प्रेक्षकांचा लोकप्रिय आहे.  आता हा शो  प्रथमच व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून JioTV वर रिलीज केला जाणार आहे. नेहा धुपिया म्हणाली, 'मी 'नो फिल्टर नेहा' च्या सहाव्या सीझनसाठी नवीन व्हिडिओ फॉरमॅटमध्ये JioTV सोबत पुन्हा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.  चित्रपट उद्योगाच्या ग्लॅमरस क्षेत्राची झलक दाखवणाऱ्या  स्पष्ट आणि निखळ संभाषणांसाठी तयार व्हा'. 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये नेहा बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 

नेहानं  2002 मध्ये 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती. तर तिने कयामत : सिटी अंडर थ्रेट, शीशा,  क्‍या कूल हैं हम, हे बेबी, शूटआउट एट वडाला, दस कहानियां, सिंह इज किंग, रामा रामा क्‍या है ड्रामा, दे ताली, लस्‍ट स्‍टोरीज, अ थर्सडे आणि सनक या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच रोडिज या शोमुळे नेहाला विशेष लोकप्रियता मिळाली. 

टॅग्स :नेहा धुपियासेलिब्रिटीबॉलिवूड