Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीना गुप्तांमुळे मोडला मसाबाचा पहिला संसार?; स्वत:ला दोष देत म्हणाल्या, 'माझी चूक झाली..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 07:48 IST

Neena gupta: मसाबाने जानेवारी महिन्यात सत्यदीप मिश्रासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. यापूर्वी तिने निर्माता मधू मंटेनासोबत पहिलं लग्न केलं होतं.

प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेखील बेधडकपणे व्यक्त होणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (neena gupta).  नीना गुप्ता यांनी त्यांच्या 'सच कहूँ तो' या आत्मचरित्रामध्येही त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी बरेच खुलासे केले आहेत. मात्र, यावेळी त्या त्यांच्या लेकीमुळे मसाबा गुप्तामुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मसाबाचं पहिलं लग्न मोडण्यामागे आपणच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. माझ्यामुळे मसाबाचं पहिलं लग्न अयशस्वी ठरलं असं त्या यावेळी म्हणाल्या.

नीना गुप्ता यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मसाबा आणि निर्माता मधू मंटेना यांच्या घटस्फोटाविषयी भाष्य केलं. लेकीचा संसार मोडण्यामागे आपणच कारणीभूत असल्याचं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेल्या मसाबाने जानेवारी महिन्यात सत्यदीप मिश्रासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. यापूर्वी तिने निर्माता मधू मंटेनासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार टिकला नाही. विशेष म्हणजे लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतरही त्यांचा संसार अल्पावधीत मोडला. याविषयी नीना गुप्ता यांनी नेमकी कुठे चूक झाली ते सांगितलं.

नीना गुप्तामुळे मोडला लेकीचा पहिला संसार?

"मी सांगते माझी नेमकी कशी चूक झाली. जेव्हा मसाबाचं लग्न झालं त्यावेळी खरं तर तिला लग्न करायचं नव्हतं. तिला तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायचं होतं. मात्र, त्याचवेळी माझ्यातली आई कशी काय जागी झाली काय माहित. मी तिला म्हटलं की नाही. तू त्याच्यासोबत लग्न केल्याशिवाय एकत्र राहू शकत नाही. माझी तिच खरी चूक झाली", असं नीना गुप्ता म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "ते दोघे माझ्यामुळेच विभक्त झाले. मी खूप निराश झाले होते. पण, त्या दोघांचं जमलं नाही तर आपणही त्याला काहीच करु शकत नाही. ज्यावेळी मसाबाने मला घटस्फोट घेण्याविषयी सांगितलं. त्यानंतर जवळपास महिनाभर मी सुन्न होते. तो काळ खरंच खूप कठीण होता."

दरम्यान, मसाबाने २०१५ मध्ये मधू मंटेनासोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या चार वर्षानंतर ते विभक्त झाले. मसाबाचं इंडस्ट्रीत मोठं नाव आहे. ‘हाऊस ऑफ मसाबा’ हा तिचा फॅशन ब्रँडसुद्धा तितकाच बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे.

टॅग्स :बॉलिवूडनीना गुप्तासेलिब्रिटीसिनेमा