Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या सेक्स सीन्समुळे नीलमला लागली संसाराची चिंता

By admin | Updated: April 24, 2017 12:55 IST

बॉलिवूडची एकेकाळची सौदर्यवान अभिनेत्री नीलम कोठारीच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे वृत्त आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 24 - बॉलिवूडची एकेकाळची सौदर्यवान अभिनेत्री नीलम कोठारीच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे वृत्त आहे. बॉलिवूड पापा या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानसार नीलम सध्या पती समीर सोनीच्या वेब सीरिजमधील प्रणय दुश्यांमुळे अस्वस्थ असून तिला आपल्या संसाराची चिंता सतावत आहे. अभिनेता समीर सोनीने एकता कपूरच्या "बेवफा सी वफा" या वेब सीरिजमधून कमबॅक केले आहे. 
 
या वेब सीरिजमध्ये समीर सोनी मुख्य भूमिकेत असून, विवाहबाह्यसंबंधांवर या मालिकेचे कथानक आधारले आहे. ही वेब सीरिज समीर सोनी, दीपानीता शर्मा आणि आदिती वासुदेव यांच्या प्रणय दुश्यांनी भरलेली आहे. बेवफा सी वफाचे प्रोमो पाहिल्यानंतर सेक्स सीन्स इतके आवेश, उत्कंटतेने भरलेले असतील असे आपल्याला वाटले नव्हते असे नीलमने समीरला बोलून दाखवले. 
 
नीलमच्या या प्रतिक्रियेनंतर समीरने मालिकेच्या निर्मात्यांना काही दृश्यांवर कात्री चालवण्याची विनंतीही केली. पण त्यांनी दुश्यांवर कात्री चालवायला नकार दिला. नीलम आणि समीरच्या लग्नाला सहावर्ष झाली असून, या जोडप्याला एक मुलगी आहे.