Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री बनणार होती देओल कुुटुंबाची सून, पण पाच वर्षांच्या नात्यानंतर बॉबीसोबत झाले ब्रेकअप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 19:07 IST

बॉबी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती.

ठळक मुद्देबॉबी आणि नीलम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. दोघे लग्नही करणार होते.

90 च्या दशकात बॉबी देओल व नीलम कोठारी यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. नीलम ही त्याकाळातील अतिशय सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. बॉबी आणि नीलम यांचे कपल खूपच क्यूट वाटत होते. पण अफेअरच्या पाचच वर्षांत दोघांचे ब्रेकअप झाले. 

बॉबी आणि नीलम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण असे असताना अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि पाठोपाठ या ब्रेकअपसाठी पूजा भट्टला दोषी ठरवले गेले. बॉबी आणि पूजा भट्टची जवळीक वाढल्यामुळे नीलमने बॉबीशी ब्रेकअप केले, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. अर्थात पुढे अनेक वर्षांनी एका मुलाखतीत खुद्द नीलमने या चर्चा खोट्या ठरवल्या होत्या. आम्ही दोघांनी संगनमताने ब्रेकअप केले असे तिने स्टारडस्ट या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. बॉबी आणि माझे ब्रेकअप कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिमुळे झाले नव्हते. तो आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता, असे नीलमने या मुलाखतीत स्पष्ट केले होते.

बॉबी आणि नीलम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र पापा धर्मेंद्र यांना बॉबीचे हे लग्न मान्य नव्हते. सिनेमात काम करणारी मुलगी त्यांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी हे लग्न होऊन दिले नाही. बॉबीने अरेंज मॅरेज करावे, अशी त्यांची इच्छा होते. पित्याच्या इच्छेखातर बॉबी नीलमपासून वेगळा झाला होता, अशी देखील चर्चा त्याकाळात रंगली होती. 

टॅग्स :बॉबी देओल