Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला तिच्याशी लग्न करायचं होतं...", गोविंदासोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "आमच्यामध्ये..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:11 IST

गोविंदाचं बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. अभिनेत्री नीलम कोठारी हिच्यासोबतदेखील गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता नीलम कोठारीने भाष्य केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने अभिनेत्यावर एक्स्ट्रा मरेटियल अफेअरचे आरोप केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून गोविंदा आणि सुनिता अहुजा वेगळे राहत आहेत. गोविंदाचं बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. अभिनेत्री नीलम कोठारी हिच्यासोबतदेखील गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता नीलम कोठारीने भाष्य केलं आहे. 

९०च्या दशकात गोविंदा आणि नीलम कोठारीच्या अफेअरच्या चर्चा होत्या. यावर इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने उषा काकडे प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. नीलम म्हणाली, "अरे देवा... हे कोणी सांगितलं? गोविंदा एक चांगले व्यक्ती आहेत. पण या चर्चा खऱ्या नाहीत. आम्ही दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण आमच्यात तसं काहीच नव्हतं. त्यावेळी आम्हाला कुठेच आमचं मत मांडता यायचं नाही. जे वाटेल ते छापून यायचं. खरं सांगायचं तर त्यावेळी आम्हाला प्रेसची भीती वाटायची. जर तुम्ही एकत्र दोन तीन सिनेमे केले तर असं समजलं जायचं की यांचं अफेअर आहे". 

गोविंदाने जुन्या मुलाखतीत नीलमसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, "आम्ही अनेक सिनेमे एकत्र केले आणि अनेकदा आम्ही भेटायचो. मला ती आवडायला लागली होती. ती एक अशी मुलगी होती जिच्यावर कोणीही फिदा झालं असतं. मी सुनितासोबत केलेला साखरपुडाही मोडला होता. जर सुनिताने फोन करून माझी समजूत घातली नसती तर मी नीलमसोबत लग्न केलं असतं. मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. आणि यात काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही". 

गोविंदाने १९८७ साली सुनिता अहुजासोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना दोन मुलं आहेत. तर नीलमने बिजनेसमॅन ऋषि सेठिया यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर २०११ मध्ये तिने अभिनेता समीर सोनीसोबत दुसरं लग्न केलं. त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Neelam Kothari addresses affair rumors with Govinda after years.

Web Summary : Neelam Kothari finally breaks silence on affair rumors with Govinda. She denies any romantic involvement despite their on-screen chemistry. Govinda had confessed his desire to marry Neelam, even breaking off his engagement with Sunita. Neelam is now married to Samir Soni.
टॅग्स :गोविंदासेलिब्रिटी