Join us  

नयनताराच्या संसारात वादळ? अभिनेत्रीने पतीला केलं अनफॉलो, म्हणते- डोळ्यांत अश्रू असले तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 3:44 PM

नयनतारा वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिच्या संसारात वादळ आलं आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

नयनतारा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाबरोबरच नयनतारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता नयनतारा वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिच्या संसारात वादळ आलं आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

अभिनेत्रीने तिचा पती आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवण याला इन्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. त्यामुळे नयनतारा आणि विघ्नेशमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नयनताराने पतीला अनफॉलो केल्यानंतर एक क्रिप्टिक पोस्टही शेअर केली आहे. "डोळ्यांत अश्रू असले तरीही ती म्हणेल की मला हे मिळालं आहे," असं नयनताराने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमुळे त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नयनताराने पतीला अनफॉलो केलं असलं तरीही तो मात्र अजूनही तिला फॉलो करतो. तसंच विघ्नेशने काही दिवसांपू्र्वीच नयनताराचे फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्टही लिहिली होती. 

नयनतारा आणि विघ्नेश २०१५ साली नानुम राउडी या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते.  त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. ६ वर्षांच्या डेटिंगनंतर नयनतारा आणि विघ्नेशने लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२२मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर सरोगसी पद्धतीने त्यांना जुळी मुले झाली आहेत. 

टॅग्स :नयनताराTollywoodसेलिब्रिटी