नवाजूद्दीन सिद्दिकीने अल्पावधीतच त्याची दखल घ्यायला भाग पाडले आहे. आता समस्त खानदान त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. यात सलमानने तर त्याची हौस आधीच भागवली होती. मात्र ‘किक’मधील सलमान खान-नवाजूद्दीन सिद्दिकीची जोडी पाहून दिग्दर्शक कबीर खानने पुन्हा एकदा याच जोडीला चित्रपटात घेतले आहे. ‘बजरंगी भाईजान’मध्ये नवाजुद्दीन पाकिस्तानी नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.