अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मराठी अभिनेत्री हेमल इंगळेदेखील आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हेमलच्या घरी लगीनघाई सुरू आहे. आता लगीनघटिका समीप आली आहे. वरात घेऊन हेमलचा नवरा आला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
लग्नासाठी वरात घेऊन आलेल्या हेमलच्या नवऱ्याचं तिच्या कुटुंबीयांकडून खास स्वागत करण्यात आलं. जावयाच्या एन्ट्रीला चक्का सासूबाईंनी म्हणजेच हेमलच्या आईने डान्स केला. "दामाद जी" या गाण्यावर हेमलच्या आई आणि कुटुंबीयांनी डान्स केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर औक्षण करून त्याचं स्वागत केलं. हेमलच्या लग्नातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेमलच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव रोनक कोरडीया असं आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हेमल आणि रोनकने साखरपुडा केला होता. आता लग्नाच्या बेडीत अकडून ते नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. हेमलने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशी ही आशिकी, नवरा माझा नवसाचा २ या सिनेमांमध्ये ती दिसली होती.