Join us  

अजय देवगणसाठी नाशिकमधील व्यक्तीचं भीख माँगो आंंदोलन, म्हणाला, 'त्याला पैशांची गरज...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 9:36 AM

भीक मागून मिळालेले पैसे अजय देवगणला पाठवणार. पण कारण काय?

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण (Ajay Devgn) आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी निर्माता दिग्दर्शक आतुर असतात. तसंच अनेक कलाकारांनाही अजयसोबत स्क्रीनशेअर करायची इच्छा असते. मात्र दुसरीकडे अजय तो करत असलेल्या जाहिरातींमुळे कायम ट्रोल होतो. पान मसालाची जाहिरात असो किंवा मग आता ऑनलाईन गेमिंगची जाहिरात यामुळे अजयला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. इतकंच काय नाशिकमधील एक माणूस अजयच्या विरोधात भीख माँगो आंदोलन करत रस्त्यावर उतरला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोण कधी काय करेल काही सांगता येत नाही. आंदोलन करायचं म्हणलं तरी अनेक हटके पद्धती अवलंबल्या जातात. नाशिक शहरात एका माणसाने असंच एक विचित्र आंदोलन केलं. एक व्यक्ती अजय देवगणसाठी पैसे जमा करण्यासाठी भीक मागत रस्त्यावर उतरला. 'अजय देवगण के लिए भीख माँगो आंदोलन' असं पोस्टर घेत तो टू व्हीलरवर शहरात फिरत होता. हे नेमकं कशासाठी असं त्याला विचारलं असता समजलं की तो ऑनलाईन गेमिंग आणि त्याच्या जाहिरातींना विरोध दर्शवत होता. तो म्हणाला, 'या सेलिब्रिटींजवळ पैसा, प्रसिद्धी सगळं काही आहे. तरी सुद्धा हे लोक ऑनलाईन गेमिंगना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती करतात. याचा तरुणांवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच मी भीख माँगो आंदोलन करण्याचं ठरवलं आणि रस्त्यावर भीख मागायला सुरुवात केली.'

तो पुढे म्हणाला. 'मी हे पैसे अजय देवगणला पाठवणार असून त्याला अशा जाहिराती न करण्याची विनंती करणार आहे. जर तुम्हाला पैशांची गरज आहे तर मी पुन्हा भीक मागेन आणि पैसे पाठवेन कृपया अशआ जाहिराती करु नका. गांधीगिरी स्टाईलमध्ये मी हे आंदोलन करत आहे.'

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीने हे अनोखं आंदोलन करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. 

टॅग्स :अजय देवगणनाशिकजाहिरातसोशल मीडियासोशल व्हायरल