Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्याला करायचीय नरेंद्र मोदींची हेरगिरी

By admin | Updated: June 5, 2014 09:19 IST

आहे. विद्याच्या मते, तिला हेरगिरी करण्याची संधी मिळालीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हेरगिरी करायला तिला आवडेल.

विद्या बालन तिच्या ‘बॉबी जासूस’ या आगामी चित्रपटात हैदराबादी गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. विद्याच्या मते, तिला हेरगिरी करण्याची संधी मिळालीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हेरगिरी करायला तिला आवडेल. एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला विद्याने हे उत्तर दिले. विद्या म्हणाली, ‘मला जाणून घ्यायचे आहे की, एवढे जनसमर्थन मिळाल्यानंतर त्यांच्या (नरेंद्र मोदींच्या) मनात काय सुरू आहे? त्यांनी देशाला जी वचनं दिली आहेत, ती पूर्ण करण्याच्या त्यांच्याकडे काय योजना आहेत? मला ही उत्तरं सर्वांच्या आधी जाणून घ्यायची आहेत.’ विद्याच्या बॉबी जासूस या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होईल.