Join us

मराठी अभिनेत्रीचा नवऱ्याबाबत खुलासा, म्हणाली, त्याने सर्व EX बॉयफ्रेंड्सना घरी बोलावलं अन्...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:52 IST

टीव्हीवरील एका हँडसम अभिनेत्यासोबत तिचं बरेच वर्ष अफेअर होतं.

'कुसुम', 'पिया का घर', 'नमक हराम', 'रिश्तो का चक्रव्यूह', 'फिर सुबह होगी', 'लाल ईश्क' अशा अनेक टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नारायण शास्त्री (Narayani Shastryi) आठवतेय? नाना पाटेकर यांच्या 'पक पक पकाक' सिनेमात तिने साळू ही व्यक्तिरेखा साकारली. नारायणीने  २०१५ साली परदेशी बॉयफ्रेंड स्टीवन ग्रेवरसोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न तिने बराच काल सीक्रेटच ठेवले होते. आता नुकतंच तिने नवरा स्टीवन बाबत एक खुलासा केला आहे.

नारायणी शास्त्री आणि टीव्ही अभिनेता गौरव चोप्रा यांचं अफेअर मध्यंतरी खूप चर्चेत होतं. मात्र अभिनेत्रीच्या व्यसनामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याचं नंतर समोर आलं. नारायणीने काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. ती म्हणाली, "स्टीवन आणि माझं नातं खूप छान आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. माझी माझ्या सर्व एक्स बॉयफ्रेंड्सोबत आजही छान मैत्री आहे. मला माझे मित्र किती महत्वाचे आहेत हे स्टीवन ओळखतो. म्हणूनच एकदा त्याने माझ्या वाढदिवसाला चक्क माझ्या सर्व एक्स बॉयफ्रेंड्सना बोलावत मला सरप्राईज दिलं होतं. तसंच तो कधीच माझ्या आणि गौरवच्या मैत्रीमुळे असुरक्षित वाटून घेत नाही. "

नारायणी आणि गौरव चोप्रा टीव्ही विश्वातलं अत्यंत चर्चेतलं कपल होतं. दोघंही लग्न करतील अशीही चर्चा होती. नच बलिये सीझन २ मध्ये त्यांनी सहभागही घेतला होता. मात्र नंतर त्यांच्यात वाद झाले आणि त्यांचं नातं तुटलं. आज दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

टॅग्स :नारायणी शास्त्रीमराठी अभिनेतासोशल मीडियारिलेशनशिप