Join us

नानाने पेलले ‘नटसम्राट’चे आव्हान

By admin | Updated: October 19, 2015 13:15 IST

वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले आहे. ‘कुणी घर देता घर’ अशी आर्त साद घालणाऱ्या गणपतराव बेलवलकर

वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले आहे. ‘कुणी घर देता घर’ अशी आर्त साद घालणाऱ्या गणपतराव बेलवलकर यांच्या वेदनेचा हुंकार प्रेक्षकांचे हृदय हेलावून टाकतो. दत्ता भट, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, डॉ. श्रीराम लागू, यशवंत दत्त, राजा गोसावी यांनी रंगभूमीवर ‘नटसम्राट’ गाजविला. उत्कृष्ट संहिता, संवाद, अभिनय ही नाटकाची वैशिष्ट्य. हे नाटक आता रूपेरी पडद्यावर येत आहे. अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात उतरत असून, ‘नटसम्राट’ साकारण्याचे आव्हान त्यांनी पेलले आहे. महेश मांजरेकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पाटेकर यांच्या समवेत नेहा पेंडसे, विक्रम गोखले आणि सुनील बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.