Join us  

नच बलियेत मराठमोळ्या अमृता - हिमांशूची बाजी

By admin | Published: July 20, 2015 10:08 AM

नच बलिये या रिएलिटी शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा या जोडीने विजेतेपद पटकावले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २० - नच बलिये या रिएलिटी शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा या जोडीने विजेतेपद पटकावले आहे. सचिन पिळगावकर - सुप्रिया यांच्यानंतर नच बलियेत बाजी मारणारी अमृता दुसरी मराठी कलाकार ठरली आहे. 
वाजले की बारा या लावणीने चाहत्यांची मनात स्थान पटकावणारी अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा ही जोडी नच बलिये या शोमध्ये सहभागी झाले होते. शोच्या पहिल्या टप्प्यापासूनच अमृता - हिमांशूच्या जोडीने दमदार नृत्यामुळे प्रेक्षक व परिक्षकांची वाहवा मिळवली होती.  या शोची महाअंतिम फेरी रविवारी पार पडली असून या फेऱीत नृत्य व त्याला प्रेक्षकांनी दिलेला भरभरुन प्रतिसाद या आधारे अमृता - हिमांशू या जोडीने विजेतेपद पटकावले. त्यांना ३५ लाख रुपये रोख व एक गाडी पारितोषिक म्हणून देण्यात आले. रश्मी - नंदीश ही जोडी दुस-या तर करिष्मा तन्ना व उपेन पटेल या जोडीला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. नच बलियेत ले.