Join us

एन. चंद्रा मराठी सिनेमाकडे परतणार?

By admin | Updated: November 7, 2015 00:38 IST

अनेक मनोरंजनात्मक चित्रपट तयार करून दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तेजाब ओरिजनल आणि नवीन, यह मेरा इंडिया,

अनेक मनोरंजनात्मक चित्रपट तयार करून दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तेजाब ओरिजनल आणि नवीन, यह मेरा इंडिया, स्टाईल, एक्स्क्युज मी, शिकारी, युगंधर, अंकुश असे एकसे एक चित्रपट त्यांनी बॉलीवूडमध्ये बनवले आहेत. काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती, तर काही चित्रपटांची कथाही लिहिली आहे. याशिवाय, त्यांनी पुरुषोत्तम बेर्डेनिर्मित ‘घायाळ’ या मराठी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. अलीकडे मराठी चित्रपटांच्या इव्हेंट्स, संगीत प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी एन. चंद्रा यांची उपस्थिती सगळ्यांनाच आश्चर्यचकित करीत आहे. त्यामुळे एन. चंद्रा मराठी इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडणे साहजिक आहे. त्यांच्यासाठी एक मस्त बातमी आहे. मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत आणि मराठी चित्रपट संपूर्ण जगात पोहोचला, हे आपल्याला माहीतच आहे. हाच चांगला मुहूर्त साधून एन. चंद्रा एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. त्यांच्या तेजाब, स्टाईल, एक्सक्युज मी या चित्रपटांप्रमाणे ते निर्मित करीत असलेल्या या मराठी चित्रपटालाही चांगले यश मिळेल, याबद्दल शंकाच नाही.