‘क्षणभर विश्रांती’, ‘नो एन्ट्री, पुढे धोका आहे’, ‘शासन’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी सुंदर अभिनेत्री मनवा नाईक हिचा नुकताच ‘पिंडदान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती एका हटक्या व बिनधास्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच या भूमिकेसाठी तिने काय तयारी केली? काय आव्हाने आली? पहिल्यांदा नवीन टीमसोबत काम करतानाचा अनुभव, या सर्व गोष्टींविषयी अभिनेत्री मनवा नाईक हिने ‘लोकमत सीएनएक्स’सोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.पिंडदानमधील तुझ्या अभिनयाविषयी काय सांगशील?- पिंडदान या चित्रपटात मी रूई नावाच्या कॅमेरामनच्या भूमिकेत आहे. ती इंडियाची असून, लंडनमध्ये स्थायिक झालेली आहे. आणि ती तेथील एका नामांकित चॅनेलच्या वतीने पिंडदान याविषयी डॉक्युमेंट्री करण्यासाठी भारतात येते. तिची डाक्युमेंट्री काय आणि कशी बनते, त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटातील कॅमेरामनच्या भूमिकेसाठी काही खास तयारी केली होती का?- मला अॅक्च्युली कॅमेरा हाताळता येतो. फक्त ती भाषा, वेगळी बॉडी लँग्वेज आत्मसात करावी लागली. तसेच या चित्रपटासाठी सेटल परफॉर्मन्सची खूप डिमांड होती. त्यामुळे तो सेटल मेन्टेन करण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागली. तसेच मी आणि सिद्धार्थने शूटिंगवेळी आॅन द फ्लोअर खूप काम केले आहे. प्रत्येक सीन परफेक्ट व्हावा यासाठी आम्ही खूप तयारी केली होती. लंडनची कॅमेरामन म्हटलं, तर भाषेची काही अडचण जाणवली का?- या भूमिकेसाठी लंडनची कॅमेरामन असल्यामुळे इंग्रजी चांगलेच पाहिजे होते, म्हणजेच तो अॅक्सेन्टदेखील आला पाहिजे होता. त्यासाठी मी आणि सिद्धार्थने चांगली तयारी केली होती. भाषेत तो सुसंस्कृतपणा आणला होता. कारण तो खोटा अॅक्सेन्ट आम्हाला दाखवायचा नव्हता. भूमिका सोपी असली तरी खूप कठीण होती.तू यापूर्वी दिग्दर्शनदेखील केले आहे. त्यामुळे दिग्दर्शन आणि अभिनय काही फरक वाटला का?- दिग्दर्शन करताना सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. अभिनय हे एकच डिपार्टमेंट तुम्हाला टेक्निकली हॅन्डल करत असतो. थोडक्यात अभिनय हा सेल्फिश आहे. पण दिग्दर्शन हे सर्व टीमला धरून करावे लागते. म्हणजेच अभिनय हा एकवचनी असतो, तर दिग्दर्शक हा अनेकवचनी असतो. पिंडदान या विषयावर आधारित हा चित्रपट आहे का? - पिंडदान हा विषय असला, तरी या चित्रपटामध्ये पिंडदान या विषयावर भाष्य करण्यात आले नाही. तसेच याविषयीच्या भाव-भावनांनादेखील या चित्रपटात स्पर्श करण्यात आलेला नाही. पिंडदानच्या निमित्ताने घडून आलेल्या लव्हस्टोरीची ही रहस्यमय कथा आहे. पिंडदान या विषयाशी काही लोकांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा असतात. मग तू या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवते?- मी पर्सनली या गोष्टींवर अजिबातच विश्वास ठेवत नाही. माझ्या घरात लहानपणापासून मला देव, दानव, अंधश्रद्धा याविषयी काही शिकवलं नाही. नेहमीच माझ्यावर आई-वडिलांनी सेल्फ पॉवर, ह्युमॅनिटी या गोष्टींचे संस्कार केले आहेत. या चित्रपटाविषयीचा संपूर्ण अनुभव कसा होता?- माझ्या आठवणीत पिंडदान हा सर्वात फास्ट होणारा चित्रपट आहे. कारण चित्रपट करायला एक ते दोन वर्षे लागतात. पण हा पटकन झालेला चित्रपट आहे. तसेच या चित्रपटातील सर्व कलाकारांसोबत मी पहिल्यांदा काम करतेय. खूप मेहनत घेणारी ही टीम आहे. पिंडदान या चित्रपटाने मला चांगली चांगली माणसे दिली आहेत.
- benzeerjamadar@lokmat.com