बॉलीवूडचा खिलाडी अशी ख्याती असलेल्या अक्षय कुमारला त्याची पत्नी टि¦ंकल खन्नाचा अभिमान आहे. टि¦ंकल एकीकडे अक्षयला ‘मॅन ऑफ द हाऊस’ असे म्हणते, तर दुसरीकडे अक्षयच्या मते, टि¦ंकल सुपर वूमन आहे. अक्षयने मायक्रो ब्लॉगिंग साईट टि¦टरवर एक फोटो पोस्ट केला आहे. एका आघाडीच्या फॅशन मासिकावर झळकलेला हा टि¦ंकलचा फोटो आहे. अक्षयने फोटोखाली लिहिले आहे की, ती मला ‘मॅन ऑफ द हाऊस’ म्हणते, पण खरं तर ती माझी सुपर वूमन आहे.’ अक्षय कुमार-टि¦ंकल 2क्क्1 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांना आरव आणि नितारा ही अपत्ये आहेत. लगAानंतर टि¦ंकलने अभिनयापासून फारकत घेतली असून ती आता इंटेरिअर डिझायनिंगचे काम करीत आहे.