Join us

बायकोच माझा आत्मविश्वास

By admin | Updated: February 13, 2016 03:09 IST

नवरा-बायकोच्या नात्यातील बंध जेवढे हळुवार विणले जातात, तेवढेच ते नाते अधिक घट्ट होते, असे म्हणतात आणि कोणतेही नाते हे फक्त विश्वासाच्या बळावरच कायम टिकते.

 नवरा-बायकोच्या नात्यातील बंध जेवढे हळुवार विणले जातात, तेवढेच ते नाते अधिक घट्ट होते, असे म्हणतात आणि कोणतेही नाते हे फक्त विश्वासाच्या बळावरच कायम टिकते. असाच आत्मविश्वास हेमंत ढोमेला त्याची बायको क्षितीबद्दल वाटतोय. ‘क्षिती माझा आत्मविश्वास आहे,’ असे तो म्हणतोय. तुम्हाला एकाच क्षेत्रात काम करायचे असेल, तर अनेक अडचणींना, चढ-उतारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी तुम्हाला सावरायला, वाईट काळात साथ द्यायला कोणी तरी जवळची व्यक्ती किंवा तुमचा लाइफ पार्टनर हवा असतो. कदाचित हेमंतला क्षितीमध्ये बायकोपेक्षा अधिक मैत्रीणच मिळाली असेल; म्हणूनच तो म्हणतोय, ती माझा आत्मविश्वास आहे. टिष्ट्वटरवर त्याने दोघांचा फोटो शेअर केला असून, ‘माझी सगळ्यात अनमोल ठेव, माझा आत्मविश्वास माझी बायको...’ असे लिहिले आहे.