सासू आणि सुनेवर आधारित चित्रपट म्हटला, की सासूचे सुनेवर अत्याचार किंवा त्यांच्यातील खडाजंगी ठरलेली. आई आणि मुलीचे नाते फार निखळ असते. लग्नानंतर आईप्रमाणे सासू मिळावी, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. अशीच काहीशी इच्छा तेजस्विनीची होती. तिची आईप्रमाणे सासू असण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. रीअल लाइफमधील तेजस्विनी पंडित आणि तिची आई ज्योती चांदेकर या माय-लेकी सासू व सुनेच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहेत. आईच सासूच्या भूमिकेत असल्याने तेजस्विनीचा छळ होणार नाही तर या दोघी मिळून महिलांच्या अधिकारासाठी लढताना दिसतील.
माय-लेकी दिसणार सासू-सुनेच्या भूमिकेत
By admin | Updated: February 12, 2016 02:43 IST