Join us

संगीतकार जयदेव यांचा आज जन्मदिन

By admin | Updated: August 3, 2016 13:41 IST

जयदेव यांनी जेष्ठ सरोद वादक उस्ताद अली अकबर खॉं यांच्यासह अनेक गुरू कडून संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले.

- प्रफुल्ल गायकवाड
 
जयदेव यांनी जेष्ठ सरोद वादक उस्ताद अली अकबर खॉं यांच्यासह अनेक गुरू कडून संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले. संगीतकार होण्याआधी आधी त्यांनी  एस.डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणून काम केले. संगीतकार जयदेव यांनी १९५५ मधल्या “जोरू का भाई” पासून संगीत देण्यास सुरुवात केली तरी १९५५ ते १९७० या प्रदीर्घ काळात जोरू का भाई, अंजली, आणि समुंदरी डाकू, हम दोनो, मुझे जीने दो, किनारे किनारे, “हमारे गम से मत खेलो” अशा फक्त सात चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली. “जोरू का भाई” साहिरने लिहिलेली “सुबह का इंतजार कौन करें ” तलत आणि लता यांनी गायलेले गाणे अजून ही लोकांच्या लक्षात आहे. चित्रपट उद्योगात जास्त तीन दशके काम करून सुद्धा जयदेव यांनी फक्त ४० चित्रपटाना संगीत दिले. चित्रपट संगीता बरोबरच अनेक संतकवींच्या रचनाही जयदेव यांनी लता, आशा, भीमसेन जोशी अशा लोकांकडून गाऊन घेऊन अजरामर केल्या आहे. “कौनो ठगवा नगरिया लूटल हो”, रघुवर तुमको मेरी लाज, हरी आओ हरी आओ, मैं जानू नाही. या व्यतिरिक्त जयदेव यांनी हिंदी- उर्दूमधील प्रसिद्ध रचना आशा भोसलेकडून गाऊन घेतल्या आहेत. “निराला”, महादेवी वर्मा, नरेंद्र शर्मा तसेच गालिब, वगैरे कवी शायरांच्या रचना त्यात आहेत. त्यातले “मन तुमुल कोलाहल कलय में मैं हृदय की बात रे” हे गाणे ऐकणे हा “आऊट ओफ वर्ल्ड” अनुभव आहे. जयदेव यांचे ६ जानेवारी १९८७ निधन झाले.