Join us  

'मुरांबा' फेम शशांक केतकरनं ऑक्टोबरच्या गरमीला कंटाळून शेअर केला 'तो' व्हिडीओ, नेटकरी म्हणाले - "गार गार... गारवा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 9:56 AM

Shashank Ketkar : शशांक केतकरने ऑक्टोबरच्या गरमीला कंटाळून इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) मराठी सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला कोणत्याच परिचयाची गरज नाही. त्याने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या तो छोट्या पडद्यावर मुरांबा (Muramba) मालिकेत काम करताना दिसत आहे. त्याने साकारलेली अक्षयची भूमिका चाहत्यांना खूपच भावते आहे. दिवसेंदिवस शशांकच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ होताना दिसत आहे. बऱ्याचदा तो सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. दरम्यान त्याने ऑक्टोबरच्या गरमीला कंटाळून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते सुखावले आहेत.

शशांक केतकरने ऑक्टोबरच्या गरमीला कंटाळून इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि त्याची पत्नी प्रियंका दिसत आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया व्हॅकेशनदरम्यानचा आहे. यात ते बर्फात मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ऑक्टोबरच्या गरमीला वैतागल्यामुळे हा व्हिडीओ शेअर केला आहे.

शशांक केतकरच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, कितानी खुबसुरत ये तस्वीर हैं, मौसम बेमी साल, बेनझीर हैं... ये काश्मिर नाही.... Australia हैं.... जनाब शशांक... के ख या लो में..... गार् गार... गारवा... तर दुसऱ्या युजरने म्हटले की, वॉव, खूपच सुंदर दिसतंय आणि पूर्णतः सहमत. आणखी एकाने लिहिले सो कूल.

'मुरांबा' मालिकेबद्दल...

मुरांबा मालिकेबद्दल सांगायचं तर या मालिकेतील अक्षय रमा यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मालिकेत सध्या आजीने रमाला शिक्षा दिल्यामुळे रमा अक्षय दुरावले आहेत. जवळ असूनही त्यांना भेटता येत नाहीये. मात्र असे असले तरीदेखील ते दोघे त्यांच्या आईकडून त्यांच्याबद्दल जाणून घेत आहेत. त्यात रेवाचे कारस्थान काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात अक्षयसोबतच घरातले इतर सदस्यही रमाची आठवण काढताना दिसत आहे. त्यामुळे आता रमा अक्षयमधील हा दुरावा कधी संपणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.   

टॅग्स :शशांक केतकर