Join us
Daily Top 2Weekly Top 5

'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर 'मुरांबा' फेम अभिनेत्री बनवला रील, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:09 IST

'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं सध्या इन्स्टावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील्स व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही या गाण्यावर रील्स बनवत आहेत. 

सोशल मीडियावर गाण्यांचा ट्रेंड रोज बदलत असतो. रोज नवी गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. संजू राठोडच्या गुलाबी साडीने सोशल मीडिया दणाणून सोडलं होतं. 'गुलाबी साडी'नंतर संजू राठोडच्या आणखी एका गाण्याने सोशल मीडिया भुरळ पाडली आहे. 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं सध्या इन्स्टावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील्स व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही या गाण्यावर रील्स बनवत आहेत. 

'मुरांबा' फेम अभिनेत्रीने 'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मुरांबामधील अभिनेत्री निशाणी बोरुले हिनी 'एक नंबर, तुझी कंबर...'वर डान्स केला आहे. डिझायनर लेहेंगा घालून तिने या गाण्याच्या हुक स्टेप केल्या आहेत. निशाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

निशाणीने 'मुरांबा' मालिकेत रेवा हे पात्र साकारलं होतं. खलनायिकेची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. निशाणी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. वैयक्तिक आणि करिअरचे अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी