Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयानंतर या क्षेत्रात पदार्पण करतेय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:09 IST

नुकतेच या सिनेमाचे नवीन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे.  

‘मन फकीरा’ हा रोमँटिक ड्रामा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने लिहिला असून तीच या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत. ‘नात्यांचा खरा अर्थ सांगणारा’ हा सिनेमा आता ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन फकीरा’ हा मृण्मयी देशपांडेचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला पहिलाच चित्रपट आहे.    

“या सिनेमाची गाणी खूप वेगळ्या धाटणीची आहेत. ही सर्वच गाणी श्रवणीय झाली आहेत. सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल यांनी अशाच पद्धतीची खूप उत्तम दर्जाची गाणी ‘मन फकीरा’साठी रचली आहेत. ‘मन फकीरा’ हे गाणे इतके श्रवणीय झाले आहे की ते प्रेक्षकांच्या तोंडी बसेल. वैभव जोशी आणि क्षितिज पटवर्धन यांनी या सिनेमाची गाणी लिहिली आहेत. नुकतेच या सिनेमाचे नवीन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे.  

“मला आणि सिद्धार्थ महादेवनला या चित्रपटाची गाणी ही आजच्या तरुण पिढीला आवडतील अशी तयार करायची होती. या सिनेमामध्ये चार गाणी आहेत आणि चारही गाणी तरुण पिढीला नक्कीच आवडतील. ही सर्व गाणी सिनेमाच्या कथेला चांगल्याप्रकारे पुढे घेऊन जातात. आम्हाला ‘मन फकीरा’ करताना खूप आनंद मिळाला आणि त्याचे सर्व श्रेय आम्ही सिनेमाच्या दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिला देतो. या सिनेमाची सर्व गाणी प्रेक्षकांना आवडतील असा आम्हाला विश्वास आहे,” असे मत चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सौमिल शृंगारपुरे यांनी मांडले.

 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेसुव्रत जोशी