Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल दुसानिसचा फॅमिली टाईम, न्यूयॉर्क शहराचा सुंदर व्ह्यू कॅमेऱ्यात कैद; लेक नुर्वीने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 09:28 IST

न्यूयॉर्क शहरात टॉप व्ह्यू एन्जॉय करतानाचा एक व्हिडिओ मृणाल दुसानिसने शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. गेल्या काही वर्षांपासून ती पती नीरज मोरेसह (Neeraj More) अमेरिकेत स्थायिक झाली आहे. लग्नानंतर मृणाल अभिनयापासून दूर गेली. 2016 साली तिने नीरजसोबत लग्न केले. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अमेरिकेतच राहतो. मृणालने लग्नानंतर काही काळ 'हे मन बावरे' मालिका केली मात्र नंतर ती कायमची अमेरिकेत स्थायिक झाली.त्यांना नुर्वी ही गोड मुलगी आहे. नुकताच मृणालने पती आणि लेकीसोबत एक न्यूयॉर्क मधील एक व्हिडिओ शेअर केलाय.

न्यूयॉर्क शहरात टॉप व्ह्यू एन्जॉय करतानाचा एक व्हिडिओ मृणाल दुसानिसने शेअर केला आहे. यामध्ये पती नीरज मोरे आणि चिमुकली नुर्वी दिसत आहे. दीड वर्षांची नुर्वी सुद्धा तो व्ह्यू एन्जॉय करताना दिसते. 'वन्स अपॉन अ टाईम इन न्यूयॉर्क' असं कॅप्शन मृणालने या व्हिडिओला दिलंय. नुर्वी अगदी मृणालसारखीच दिसते. सध्या मृणालच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

मृणाल गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. पण तरी चाहते आही तिची आठवण काढत असतात. ' ताई लवकर इकडे ये ना, तुझ्याशिवाय मराठी इंडस्ट्री अपुरी आहे' अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. तर मृणाल मात्र संसारात रमलेली आहे. लेक नुर्वीमुळे तिचं कुटुंब पूर्ण झालंय.

टॅग्स :मृणाल दुसानीसमराठी अभिनेतापरिवारअमेरिकासोशल मीडिया