Join us

मोटारसायकलवरील याराना ठरला सुपरहिट

By admin | Updated: July 25, 2016 02:38 IST

‘शोले’ या सुपरहिट चित्रपटातील मोटारसायकल आणि त्याला जोडलेल्या साइड कारने मैत्रीला एक नवी ओळख दिली आहे.

‘शोले’ या सुपरहिट चित्रपटातील मोटारसायकल आणि त्याला जोडलेल्या साइड कारने मैत्रीला एक नवी ओळख दिली आहे. कारण जेव्हा-जेव्हा अशा प्रकारचा आॅनस्क्रीन याराना दाखविण्यात आला तेव्हा तो प्रेक्षकांना अत्यंत भावला. सध्या जॉन अब्राहम आणि वरुण धवन यांच्या आगामी ‘ढिशूम’ या चित्रपटातील अंदाज काहीसा असाच असल्याने तो चर्चेत ठरत आहे. दोघांच्या या पोस्टरला तर शोले स्टाइल, असे नावही दिले जात आहे. रोहित धवनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जॉन आणि वरुणचा याराना दाखविण्यात आला असून, रियल लाईफमध्येदेखील या दोघांची मैत्री घट्ट झाली आहे. यापूर्वीदेखील अशा प्रकारे आॅनस्क्रीन याराना दाखवून निर्मात्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा...अमिताभ बच्चन - धर्मेंद्र (शोले)‘शोले’ या सुपरहिट चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यातील दाखविण्यात आलेली दोस्ती आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यातही मोटारसायकलवरील ‘ये दोस्ती हम नही तोडेगे’ हे गीत आजची पिढी तेवढेच पसंत करते जेवढे त्या वेळेस केले गेले होते. अर्थात, या गाण्यातील आकर्षण राहिले ते मोटारसायकल. कारण अशी बाईक आज जरी रस्त्यावर नजरेस पडली, तरी ‘शोले’ चित्रपटातील जय-विरूची आठवण होते. या मोटारसायकलने मैत्रीला एक वेगळाच दर्जा दिला आहे. संजय दत्त - ऊर्मिला मातोंडकर (दौड)१९९७ मध्ये आलेल्या ‘दौड’ या चित्रपटातदेखील ‘शोले’ फेम मोटारसायकलवर संजय दत्त आणि ऊर्मिला मातोंडकर यांचे काही दृश्य चित्रीत करण्यात आले होते. चित्रपटात जेव्हा संजय दत्त आणि ऊर्मिलाचा पाठलाग केला जातो, तेव्हा ते दोघेही या मोटारसायकलवर स्वार होऊन पळ काढतात. चित्रपटात दोघांच्या केमिस्ट्रीचे चांगलेच कौतुक केले गेले. बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला होता. अभिषेक बच्चन - बॉबी देओल‘शोले’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची मैत्री अजरामर ठरली. या संपूर्ण चित्रपटात मोटारसायकलवरील दृश्य विशेष गाजले. अशाच ‘शोले’ फेम मोटारसायकलवर ज्युनिअर बच्चन व बॉबी देओल यांचे काही दृश्य ‘झुम बराबर झुम’ या चित्रपटात बघावयास मिळतात. वडिलांप्रमाणे मुलांनाही प्रेक्षकांनी या दृश्याला पसंती दर्शविली होती. त्यामुळेच बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट काही प्रमाणात यशस्वी ठरला. चित्रपटातील दोघांचा याराना चांगलाच रंगला होता. दोघांच्याही भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले.संजय दत्त आणि अरशद वारसी (लगे रहो मुन्नाभाई) :‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटात संजूबाबा आणि सर्किट म्हणजेच अरशद वारशी यांची जमलेली केमिस्ट्री ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्येदेखील प्रभावशाली ठरली. ‘जय-विरू’नंतर सर्वाधिक प्रेक्षकांनी पसंत केलेली जोडी दुसरी कुठली असेल, तर ती ‘मुन्नाभाई-सर्किट’ यांची आहे. त्याचबरोबर ही जोडी शोले फेम मोटारसायकलमुळेदेखील प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. जेव्हा मुन्नाभाई आणि सर्किट गावाकडे जाण्याचा विचार करतात तेव्हाच्या दृश्यामध्ये ही मोटारसायकल दाखविण्यात आली आहे.सलमान खान - शाहरूख खानबिग बॉस सिझन नऊमध्ये शाहरुख सलमानची शोले फेम मोटारसायकलवरील एंट्रीही चर्चेत राहिली आहे. दोघांमधील वितुष्ट जगजाहीर असल्यानेच या एंट्रीला त्या वेळी अधिक महत्त्व दिले गेले. दोघेही या मोटारसायकलवर ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणे गुणगुणत स्टेजवर आले. शाहरूख त्याच्या ‘दिलवाले’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या शोमध्ये आला होता. तर, सलमान या शोचा होस्ट होता. निर्मात्यांनी या संधीचे सोने करीत दोघांमधील संबंध मैत्रीपूर्ण व्हावे, याकरिता हटके एपिसोड करण्याचे ठरविले होते. त्यानुसार जय-विरूच्या स्टाईलमध्ये दोघांची एंट्री झाली. यानंतर दोघांमधील संबंध सुधारले असल्याचेही बरीच चर्चा रंगली होती.