Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीसाठी आईचा स्पेशल मेसेज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:56 IST

दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. आणि असे वाटतेय की, तिचा वाढदिवस प्रचंड अविस्मरणीय झालाय. आता तुम्ही विचार कराल की, कशामुळे? तेही खरंच म्हणा.

दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. आणि असे वाटतेय की, तिचा वाढदिवस प्रचंड अविस्मरणीय झालाय. आता तुम्ही विचार कराल की, कशामुळे? तेही खरंच म्हणा... त्याचे कारण हे आहे की, ‘सोनाची आई पूनम हिने तिला एक स्पेशल गिफ्ट एका पत्राच्या स्वरूपात दिले. त्या पत्रात सोनाक्षी तिच्या आईसाठी फारच स्पेशल आहे असे दिसतेय. पूनम त्यात लिहिते की, ‘सोनाक्षी तिला स्वत:ला माझ्या डोळयांतून पाहू शकते. मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो.’ सोनाक्षीचा बर्थडे बॅश फारच अविस्मरणीय ठरला. तिच्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी या सोहळ्याला हजेरी लावली. ती ‘तेवर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर फार काही यश आले नाही. ती सध्या ‘फोर्स २’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करते आहे.