अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या यशात तिच्या आईचा मोलाचा वाटा आहे. खुद्द सोनालीनेच या गोष्टीचा उलगडा केला आहे. बकुळा नामदेव घोटाळे या पहिल्याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. या यशानंतर सोनालीने मागे वळून पाहिलेच नाही. अप्सरा आली म्हणत आपल्या अदा आणि सौंदर्याने तिने रसिकांनाही वेड लावलं. 'क्षणभर विश्रांती', 'अजिंठा', 'मितवा' अशा अनके सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. इतकचे नाहीतर 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2' या सिनेमांतून तिने बॉलिवूडमध्येही एंट्री मारली. आता 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला 'हास्यपरी' म्हणूनही ओळखली जाते. सोनालीच्या आजवरच्या प्रवासाविषयी तिच्याशी मारलेल्या खास गप्पा...४अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तुला कुणाकडून प्रेरणा मिळाली?माझे या क्षेत्रात येण्याचे प्रेरणास्थान म्हणजे माझी आई, खरं म्हणजे माझ्या आईची अभिनेत्री बनण्याची इच्छा होती.आई लष्करात नोकरीला होती. त्या वेळी मी चार महिन्यांची पोटात असताना तिने डान्स केला होता. अभिनयाचे, डान्सचे आणि कलेचे गर्भसंस्कार माझ्यावर झाले होते. बालपणापासूनच अभिनयात करिअर करण्याची इच्छा होती. माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते. आज मला विविध सिनेमांत काम करत असताना आईचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान मिळते.४तुला कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात. तसेच महिलांना कॉमेडी जमत नाही असं जे म्हटलं जातं याबाबत तुला काय वाटतं?आजवर मी विवध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. रोमँटिक, कॉमेडी स्वरूपाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिका मी तितकीच एन्जॉय केली आहे मात्र महिलांना कॉमेडी जमत नाही हे काही मला पटत नाही. कारण, माझे स्पष्ट मत आह,े की असे एकही क्षेत्र नाही जे महिलांना जमत नाही. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर कॉमेडी असो किंवा रोमँटिक सगळ्या प्रकारच्या भूमिका मी एन्जॉय करते.४रसिकांनी तुला बॉलिवूड सिनेमात पाहिलंय त्या अनुभवाविषयी जाणून घ्यायला आवडले?मराठी रसिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्यांचे प्रेम आणि आशिवार्दामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान मिळवू शकले. त्याच जोरावर मला बॉलिवूडची संधी मिळाली. 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम २' या सिनेमात बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसह काम करण्याची संधी लाभली. या दोन्ही सिनेमांत माझ्या भूमिका तुलनेने छोट्या होत्या. तरीसुद्धा त्या मी आनंदाने स्वीकारल्या आणि रसिकांनाही त्या आवडल्या हा अनुभवसुद्धा बरेच काही शिकवणारा होता.४तुझ्या आगामी सिनेमाविषयी काय सांगशीलं?मी आणि सुबोध भावे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहोत. हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नसून लवकरच या सिनेमाची घोषणा करण्यात येणार आहे. आजच्या काळातल्या रोमँटिक कथेवर सिनेमा आधारित असून डॉ. स्वप्ना वाघमारे सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुबोधसह काम करण्यात एक वेगळीच मजा येत आहे. तसेच नुकताच एक सिनेमा हम्प्टी येथे जाऊन शूट केला आहे. त्यामुळे हम्प्टीतले नयनरम्य लोकेशन्स सिनेमात पाहायला मिळणार आहेत. आगामी काळात विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येण्याचा मानस आहे.
‘आई माझी प्रेरणास्थान’
By admin | Updated: March 15, 2017 01:40 IST