Join us

मॉन्सून सफारी

By admin | Updated: July 9, 2015 04:45 IST

पावसाळा म्हटला, की ‘फुल्ल टू धमाल’. वर्षाॠतूच्या हंगामात आऊटडोअर शूटिंगचे ‘पॅक अप’ होत असल्याने कलाकारांचा मूड ‘हॉलिडे’साठी आपोआपच सेट झालेला असतो.

पावसाळा म्हटला, की ‘फुल्ल टू धमाल’. वर्षाॠतूच्या हंगामात आऊटडोअर शूटिंगचे ‘पॅक अप’ होत असल्याने कलाकारांचा मूड ‘हॉलिडे’साठी आपोआपच सेट झालेला असतो. मग हमखास पावले वळतात आवडत्या ‘डेस्टिनेशन’कडे. पावसाळ्यात कुठल्या धबधब्याखाली जायचे... कुठे विहार करायचा...असे तुमच्या आमच्यासारखेच सेलीब्रिटीजचेही ‘प्लॅन’ ठरलेले असतात... कोणाला कुठे जायला आवडते ते सांगतायत, सर्वांचे लाडके कलाकार! अंकुश चौधरीमी मूळचा मुंबईचा असलो तरी पावसाळ्यातील माझं आवडतं डेस्टिनेशन मात्र पुणे आहे. शूटिंग बंद असेल तेव्हा पुण्यात पर्वती, चतु:शृंगी, सिंहगडावर मित्रांसोबत मनसोक्त भिजायला मला खूप आवडतं.संकर्षण कऱ्हाडेनगरला इव्हेंटनिमित्त जावं लागतं. तेव्हा मी माळशेज घाटातून जाणे पसंत करतो. पावसाळ्यामध्ये या घाटातून जाण्याची मजा काही औरच असते. घाटात वळणावर मंदिर असून, तेथे स्वीटकॉर्न, भजी खाण्यात वेगळा आनंद आहे़वीणा जामकरबालपण कोकणात गेल्यामुळे अजूनही पावसाळा म्हणून कोकण हेच डेस्टिनेशन आवडते. पावसात कागदी होड्या तयार करून घराशेजारील वाहत्या नाल्यात त्या सोडण्यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही, असे मला वाटते. पावसाळ्यात चिंब भिजताना त्या खवळत्या समुद्राच्या लाटांचा आनंद घेणे यासारखा भन्नाट अनुभव असूच शकत नाही.मानसी नाईकमी पक्की पुणेकर असल्याने मला पुण्यातल्या पावसातच भिजायला आवडतं. पाऊस सुरू झाला, की आलं टाकून चहा बनविते आणि माझ्या रूममध्ये खिडकीत बसून गरम चहाचा आस्वाद घेत पावसाचा आनंद लुटते.कादंबरी कदमम्हणतात ना, खरा पावसाचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन एन्जॉय करावा, म्हणजे पावसाचा खरा आनंद लुटल्यासारखा आहे, त्यामुळे पावसाळ्यात माझं आवडणारं डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा.