Join us

मोहित सुरी ‘आशिकी ३’मधून बाहेर

By admin | Updated: November 25, 2015 02:19 IST

नव्वदच्या दशकात म्युझिकल ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘आशिकी’चा दुसरा भाग ‘आशिकी २’देखील तितकाच यशस्वी ठरला. त्यामुळेच आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूूर यांची आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणना होऊ लागली.

नव्वदच्या दशकात म्युझिकल ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘आशिकी’चा दुसरा भाग ‘आशिकी २’देखील तितकाच यशस्वी ठरला. त्यामुळेच आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूूर यांची आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणना होऊ लागली. याचे दिग्दर्शन मोहित सुरीने केले होते. आता एवढा मोठा हिट फॉर्म्युला मिळाल्यावर निर्मात्यांनी ‘आशिकी ३’ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावेळी त्याचे दिग्दर्शन मोहित सुरी करणार नसल्याची माहिती मिळत आहे. निर्माते महेश भट आणि भूषण कुमार यांनी मोहितला दिग्दर्शनाची आॅफर दिली होती, मात्र अधिक पैसे मागितल्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यामुळे निर्माते आता नव्या दिग्दर्शकाच्या शोधात आहेत.