Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 15: ‘मोहब्बतें’ फेम प्रीती झांगियानीने 'या' कारणामुळे शोमध्ये सहभागी होण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 16:22 IST

अलीकडेच अशी बातमी आली होती की 'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रीती झांगियानी 'बिग बॉस 15' मध्ये स्पर्धक म्हणून झळकणार आहे. या चर्चांवर आता प्रीतीनेच पूर्णविराम दिला आहे, या सर्व अफवा असल्याते तिने म्हटले आहे.

छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त रिएलिटी शो समजला जाणारा 'बिग बॉस'चा 15 वा सीझन पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी टीव्हीवर सज्ज होणार आहे. सध्या वूटवर हा शो पाहिला जातोय. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा शो रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता टीव्हीवर सुरु होणाऱ्या शोमध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांची यादी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. रसिकही आडत्या कलाकारांची नावं सुचवत तर्कवितर्क लावताना दिसत आहे.आ जपर्यंत कोणत्याही नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

अलीकडेच अशी बातमी आली होती की 'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रीती झांगियानी 'बिग बॉस 15' मध्ये स्पर्धक म्हणून झळकणार आहे. या चर्चांवर आता प्रीतीनेच पूर्णविराम दिला आहे, या सर्व अफवा असल्याते तिने म्हटले आहे. शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिने नकार दिल्याचे सांगितले आहे. प्रीतीने एका मुलाखतीत म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून तिला 'बिग बॉस'कडून सातत्याने ऑफर येत आहेत, पण ती प्रत्येक वेळी नकार देते.

यावेळीही, जेव्हा 'बिग बॉस 15' च्या क्रिएटिव्ह टीमने तिच्याशी संपर्क केला तेव्हाही प्रितीने स्पष्ट नकार दिल्याचे म्हटले आहे. आता जेव्हा प्रीतीला याचे कारण विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की  दोन दिवस बिग बॉसच्या घरात राहू शकणार नाही. तसा तिचा स्वभाव नाही. म्हणूनच बिग बॉस शो तिच्यासाठी नसल्याचे तिने म्हटले आहे.

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता, मानव गोहिल, रीम शेख आणि सिम्बा नागपाल सारख्या स्टार्सनाही 'बिग बॉस 15' साठी संपर्क करण्यात आला आहे. त्याचबरोबर शोमध्ये स्पर्धक म्हणून कोण दिसणार आहे. यावरुन लवकरच पडदा उठणार आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने होस्ट केलेला हा शो 3 ऑक्टोबरपासून कलर्स टीव्हीवर सुरु होणार आहे. 

प्रितीने माझाविल्लू या मल्याळम सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा ‘मोहब्बतें’ होता. हा सिनेमा 2000 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.‘मोहब्बतें’च्या यशानंतर प्रीती झांगियानीची प्रचंड चर्चा झाली होती. कालांतराने हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली आणि संसारात रमली.

टॅग्स :बिग बॉससलमान खान