मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अभिनेत्री, मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री डेल हैडनचा (dayle haydon) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालाय. पेन्सिल्वेनियामधील घरात डेलचा मृतदेह सापडला. पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केल्यावर त्यांना आढळून आणलं की, कार्बन मोनोक्साइड गॅस लीक झाल्याने ७६ वर्षीय डेनचा मृत्यू झाला. डेनच्या धक्कादायक निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
बक्स काउंटी अधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी डेल हैडनचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील तिच्या घरातील बेडरुममध्ये आढळला. पोलिसांनी तपास केल्यानुसार, गैस हिटिंग सिस्टीम आणि एक्झॉस्ट पाइपमध्ये (चिमणी) नादुरुस्ती झाल्याने कार्बन मोनोक्साइड गॅस लीक झाला. यातच डेनचा मृत्यू झाला. हा गॅस खोलीमध्ये इतक्या वेगाने पसरला की तपास करायला आलेले डॉक्टर आणि पोलीस अधिकारी बेशुद्ध झाले.
डेल हैडन आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात चांगलीच प्रसिद्ध होती. तिने १९७० आणि १९८० च्या काळात अनेक मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. डेलने केलेलं फोटोशूट तिच्या चाहत्यांमध्ये चांगलंच चर्चेत असायचं. IMDB नुसार, १९७० ते १९९० दरम्यान डेनने २० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. १९९४ साली आलेल्या 'बुलेट्स ओवर ब्रॉडवे' सिनेमात डेलने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. डेलच्या मृत्यूचा पोलीस अधिकारी सखोल तपास करत आहेत.