Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ममाज बॉईज’ म्हणजे फक्त धम्माल - आदिती राव

By admin | Updated: September 9, 2016 02:12 IST

बॉलीवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी म्हणाली, ‘अक्षत वर्मा यांच्या ‘ममाज बॉईज’ या शॉर्टफिल्ममध्ये काम करताना खूप धम्माल आली

बॉलीवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी म्हणाली, ‘अक्षत वर्मा यांच्या ‘ममाज बॉईज’ या शॉर्टफिल्ममध्ये काम करताना खूप धम्माल आली. महाभारताला मॉडर्न पद्धतीने मांडले आहे. आम्ही महाभारत वाचले आहे. आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा द्रौपदीची भूमिका मला मिळाली. खरंतर आपण द्रौपदीला फार स्ट्राँग महिला म्हणून पाहतो. पण, यामध्ये जी द्रौपदी साकारली आहे ती फारच फनी आहे. हा चित्रपट म्हणजे महाभारतासाठी जनरेशन नेक्स्ट आहे. यात काम करणे म्हणजे केवळ फनी होते. सेटवर मला हसण्यापासून थांबवणे फारच कठीण होते. माझ्या हसण्यामुळे त्यांना प्रचंड त्रास व्हायचा पण, मी मुख्य पात्र असल्याने त्यांना काही पर्यायच नव्हता.’