Join us

मिजान जाफरीची भन्साळींच्या कंपूत होणार एन्ट्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:11 IST

रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांना लॉन्च करणारे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता आणखी एका स्टार किड्सला लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांना लॉन्च करणारे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता आणखी एका स्टार किड्सला लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. होय, लोकप्रिय अभिनेता आणि कोरिओग्राफर जावेद जाफरी याचा मुलगा मिजान जाफरी याला भन्साळी लॉन्च करणार आहेत. संजय लीला भन्साळी नेहमी नव्या टॅलेंटला संधी देतात. याच क्रमात भन्साळी मिजानला संधी देणार आहेत. ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये मिजानने भन्साळींना असिस्ट केले होते. मिजान स्वत: मार्शल आर्ट्स व थिएटर करतो. शिवाय आपल्या वडिलांसारखाच तो एक उत्तम डान्सर आहे. न्यूयॉर्कमध्ये त्याने चार वर्षे फिल्म मेकिंग व व्हिज्युअल आर्ट्सचा कोर्सही केला आहे. मिजानने अलीकडे भन्साळींच्या एका चित्रपटासाठी आॅडिशन दिले होते आणि त्यादरम्यान मिजानचे टॅलेंट बघून भन्साळी चाट पडले. त्याच क्षणी मिजानला लॉन्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे कळते. भन्साळी निर्मित हा चित्रपट मंगेश हाडावले डायरेक्ट करणार. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. अलीकडे मिजान हा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत हँगआऊट करताना दिसला होता. नव्या आणि मिजान एकाच फ्रेन्ड सर्कलमधील आहेत. दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखतात. एकमेकांसोबत वेळ घालवणे दोघांनाही आवडते.