Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिथुन चक्रवर्तीच्या मुलीचे खास फोटो व्हायरल, बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 10:56 IST

दिशानी काही फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. त्यासोबतच तिच्या बॉलिवूड एन्ट्रीचीही चर्चा होत आहे. 

मुंबई : जान्हवी कपूर, सारा अली खान, नव्या नवेली, अनन्या पांडे या स्टारकिड्सची गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. स्टारकिड्सच्या या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती. दिशानीचे खास फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. त्यासोबतच तिच्या बॉलिवूड एन्ट्रीचीही चर्चा होत आहे. 

दिशानीला सुद्धा अॅक्टींगची आवड आहे. इतकेच नाहीतर दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून अॅक्टींगचं शिक्षणही घेतलं आहे. दिशानी ही मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. 

दिशानी इतर स्टारकिडप्रमाणे सोशल मीडियात चांगलीच अॅक्टीव्ह बघायला मिळते. दिशानी तशी लाईमलाइटपासून दूर राहते पण फिल्मी फॅमिलीमध्ये वाढलेल्या दिशानीला सिनेमांची फारच आवड आहे. 

दिशानी ही अभिनेता सलमान खानची मोठी फॅन आहे. दिशानीला सिनेमात करिअर करायचं आहे. पण ती योग्य संधीची वाट पाहत आहे. पण आता तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे.

दिशानीला मिथुन आणि योगिता बाली यांनी दत्तक घेतलं होतं. त्यानंतर मोठ्या लाडाने दोघांनी दिशानीचा सांभाळ केला. दिशानीसोबतच मिथुन यांना तीन मुलं आहेत. 

असे म्हणतात की, दिशानीला तिच्या जन्सदात्या आईने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले होते. त्यानंतर मिथुन यांना ही मुलगी दिसली आणि त्यांनी तिचा सांभाळ केला. 

टॅग्स :बॉलिवूड