Join us

कुठून घेतला मिर्झापूरमधील रॉबिनचा 'ये भी ठीक है' डायलॉग, आजही लोकांमध्ये आहे लोकप्रिय!

By अमित इंगोले | Updated: November 25, 2020 09:16 IST

रॉबिनच्या भूमिकेपेक्षा जास्त लोकप्रिय झाला त्याचा डायलॉग 'ये भी ठीक है'. नुकतच हा डायलॉग यात सामिल करण्याचं कारण त्याने सांगितलं. 

काही दिवसांपूर्वीच मिर्झापूर सीझन २ वेबसीरीज रिलीज झाली. प्रेक्षकांनी पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनला सुद्धा भरभरून प्रेम दिलं. या सीझनमध्ये असं खूप काही होतं जे नवं होतं. नवीन भूमिका होत्या ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यातील एक भूमिका जी सर्वांच्या नजरेत भरली ती म्हणजे रॉबिनची भूमिका. ही भूमिका मिर्झापूरमधील इतर भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. जेवढी ही भूमिका रंगीन आहे तेवढीच रहस्यमयी आहे. रॉबिनच्या भूमिकेपेक्षा जास्त लोकप्रिय झाला त्याचा डायलॉग 'ये भी ठीक है'. नुकतच हा डायलॉग यात सामिल करण्याचं कारण त्याने सांगितलं. 

रॉबिनची भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशु पॅनयुलीने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा या भूमिकेबाबत त्याला सांगण्यात आलं तेव्हा तो फार चकीत झाला होता. सीरीजमध्ये जास्तीत जास्त भूमिका या दबंग होत्या. पण रॉबिनची भूमिका जरा वेगळ्या शेड्सची होती.  प्रियांशुला ही भूमिका फार आवडली. त्याने लगेच होकार दिला. प्रियांशुला आधी वाटलं होतं की, त्यालाही बंदुक चालवायला मिळेल. पण त्याचा रोल फारच यूनिक निघाला.

रॉबिनचा डायलॉग 'ये भी ठीक है' बाबत बोलताना प्रियांशु म्हणाला की, डायलॉग त्याने त्याच्याकडूनच इम्प्रोवाइजेशन दरम्यान टाकला. यामागची कहाणी सांगत तो म्हणाला की, तो ट्रिपवर एका डोंगराळ भागात गेला होता. तिथे एक व्यक्ती 'ये भी ठीक है' हे असं म्हणायचा. ते प्रत्येक गोष्टीवर असंच म्हणायचे. त्यांना असं म्हणताना बघणं फारच भारी वाटायचं. एक पॉझिटिव्ह फिलींग येत होती. त्यामुळे प्रियांशुने हा डायलॉग रॉबिनच्या तोंडी टाकला. आज हा डायलॉग लोकांमध्ये फेमस झाला आहे. प्रियांशुही याने फार आनंदी आहे.   

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिज