Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सगळे पुरूष एक सारखेचं असतात?' असे का म्हणाली शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 17:13 IST

आजपर्यंत समोर आलेल्या फोटोत शाहिद काही ना काही तरी करताना दिसत होता. मात्र या फोटोमुळे जसं दिसतं तसं नसतं हेच सांगण्याचा मीराने प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावर शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत प्रचंड सक्रिय असते. तिच्या प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत नेटीझन्सचे लक्ष वेधून घेताना दिसते. एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणे मीराचेही सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोअर्स आहे. नेहमीच या ना त्या कारणामुळे मीराही चर्चेत असते. मीराचा अभिनयाशी सबंध नसला तरीही शाहिदची पत्नी म्हणून तिची ओळख असल्यामुळे तिचीही सोशल मीडियावर लोकप्रियता अधिक आहे. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच मीरा देखील आलिशान आयुष्य जगते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या विविध अदा पाहायला मिळतील. ग्लॅमरच्या बाबतीत मीरा बॉलिवूड अभिनेत्रींनाही चांगलीच टक्कर देत असल्याचे पाहायला मिळते. 

मीरा आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत शूज आणि सॉक्स घरात अस्तव्यस्त फेकल्याचे पाहायला मिळत आहेत. हा फोटो शेअर करुन तिने फोटोला कॅप्शनही दिली आहे.

 

फोटोपेक्षा कॅप्शननेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.तुर्तास या फोटोच्या माध्यमातून 'सगळे पुरूष एकसारखेचं असतात?' असा प्रश्न मीराने  उपस्थितीत केला आहे. शाहीद घरात कसा राहतो.  हेच सांगण्याचा प्रयत्न मीरा या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.  

शाहिद देखील कामातून वेळ मिळताच कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो. सध्या लॉकडाऊन आहे. शूटिंगही बंद आहेत. त्यामुळे घरातच बंदिस्त होत कलाकारामंडळी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहे. आजपर्यंत समोर आलेल्या फोटोत शाहिद काही ना काही तरी करताना दिसत होता. मात्र या फोटोमुळे ''जसं दिसतं, तसं नसतं'' हेच सांगण्याचा मीराने प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूर