Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडसोबत सुट्टीवर जाणार मिनिषा

By admin | Updated: June 4, 2014 09:15 IST

अभिनेत्री मिनिषा लांबा सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे आनंदात आहे. मिनिषा रेयान थाम नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात आहे.

अभिनेत्री मिनिषा लांबा सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे आनंदात आहे. मिनिषा रेयान थाम नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात आहे. रेयान मुंबई येथील एका नाईट क्लबचा मालक आहे. मिनिषा आणि रेयानची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. लवकरच रेयान आणि मिनिषा परदेशात सुट्टी घालवण्यासाठी जाणार असल्याची बातमी आहे. तीन दिवस बेल्जियममध्ये राहिल्यानंतर ते पाच दिवस लंडनला राहणार आहेत. आठ महिन्यांपासून दोघे सोबत असून, हे नाते दृढ संबंधात बदलण्याचा त्यांचा विचार आहे.