Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद सोमणची पत्नी अंकिता आहे खूप बोल्ड, पण साडीतही दिसते सुंदर, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 16:49 IST

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. लग्नाच्या पूर्वी ही जोडी त्यांच्या वयातील अंतरामुळे चर्चेत आली होती.  मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.मिलिंद त्याची पत्नी अंकिता कंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. त्या दोघांमधील वयाच्या अंतरामुळे मिलिंदला बऱ्याचदा ट्रोल केलं जातं. पण दोघांनीही याची कधीच पर्वा केली नाही.

आम्हा दोघांसाठीही वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता व मिलिंद म्हणाले होते.  

रिपोर्ट्सनुसार, अंकिता कुंवर पेशाने एक एअर होस्टेस आहे. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते.

मॉडेलिंग काळापासून मिलिंदवर अनेक तरुणी फिदा होत्या.

मॉडेलिंग, अभिनयाबरोबर मिलिंदला त्याच्या फिटनेससाठी ओळखले जाते. आतापर्यंत त्याने जगभरातील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर त्याने ‘आयरन मॅन’ हा किताबही पटकावला आहे.

मिलिंदने अखेरीस सैफ अली खानच्या ‘शेफ’ या चित्रपटात काम केले. मागील वर्षी तो फोर मोर शॉट्स प्लीझ, शॉर्ट फिल्म मुक्ती व बाजीराव मस्तानी चित्रपटात अंबाजी पंतच्या भूमिकेत दिसला होता.

फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारा मिलिंद सोमण बऱ्याचदा लोकांना फिटनेसचे टीप्स देत असतो. 

 

टॅग्स :मिलिंद सोमण