Join us

रुंजी घेणार प्रेक्षकांचा निरोप

By admin | Updated: August 29, 2016 04:05 IST

गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘रुंजी’ ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘रुंजी’ ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या मालिकेच्या टीममधील अनेक कलाकारांना चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी आपले अश्रू आवरता आले नाहीत. याविषयी वरद चव्हाण सांगतो, ‘मी गेली वर्षभर या मालिकेचा एक भाग आहे. माझ्यासाठी या मालिकेची टीम खूपच स्पेशल आहे. काही महिन्यांपूर्वी माझे वडील अभिनेते विजय चव्हाण खूप आजारी होते. तेव्हा या मालिकेच्या संपूर्ण टीमने मला खूप सांभाळून घेतले होते. सगळी टीम माझ्या पाठीशी उभी राहिली होती. त्यामुळे या टीमचा निरोप घेताना मला रडू आवरत नव्हते.’ पल्लवी पाटील या मालिकेत ‘रुंजी’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या अनुभवाविषयी पल्लवी म्हणाली, ‘पहिल्यांदाच मला ‘रुंजी’ या मालिकेमुळे प्रमुख भूमिका साकारायला मिळाली. या मालिकेमुळे मला खूप काही गोष्टी शिकता आल्या. तसेच मला खूप चांगले सहकलाकार या मालिकेच्या निमित्ताने भेटले. खूप साऱ्या चांगल्या आठवणी सोबत घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.’