Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेरे साई मालिका प्रेक्षकांना देणार शिर्डीला जाण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 08:00 IST

मेरे साई या कार्यक्रमामुळे चाहते आणि साईभक्तांना शिर्डीला भेट देण्याची संधी मिळेल, तसेच दसऱ्या दरम्यान होणाऱ्या समाधीच्या शताब्दी सोहळ्याचे दर्शन सुद्धा घेता येईल.

'मेरे साई'च्या प्रचंड प्रतिसादामुळेच, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने लोकाग्रहास्तव,' मेरे साई चलो शिरडी' ही स्पर्धा साईभक्तांसाठी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमामुळे चाहते आणि साईभक्तांना शिर्डीला भेट देण्याची संधी मिळेल, तसेच दसऱ्या दरम्यान होणाऱ्या समाधीच्या शताब्दी सोहळ्याचे दर्शन सुद्धा घेता येईल.

सुमारे 100 वर्षांपूर्वी, साईबाबांनी शिर्डी येथे समाधी घेतली. गेल्या शतकात त्याच्या अनुयायांची संख्या वाढतेच आहे. त्यांचे संदेश आणि शिकवण त्यांच्या लाखो उपासकांना दिलासा देत आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिकादेखील थोड्याच कालावधीत भारतीय टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक बनली आहे, यामुळे साईंच्या जीवनातील अनेक आकर्षक पैलूंना स्पर्श करण्यात ही मालिका यशस्वी ठरली आहे.

ही स्पर्धा 3 ते 27 सप्टेंबर दरम्यान होणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी एक प्रश्न विचारला जाईल, ज्यामध्ये एकूण आठ प्रश्न असतील जे चार आठवड्यात विचारले जातील. स्पर्धेचे प्रश्न दोन वेळा दाखवले जाणार आहेत, सात ते साडे सात दरम्यान. टोल-फ्री नंबरवर मिस्ड कॉल देऊन त्यांना प्रतिसाद द्यावा लागेल. योग्य उत्तर पाठविण्याचा कालवधी सोमवार आणि गुरुवारी 7 ते 7:45 दरम्यानच्या एपिसोडचा मध्ये असेल. अन्य सर्व दिवसांत या कॉल लाईन निष्क्रिय असतील. स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत जास्तीत जास्त उत्तरे पाठविणारे दर्शक पारितोषिके जिंकण्यासाठी पात्र ठरतील. 

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सीआयडी या मालिकेतील एसीपी प्रद्युमन म्हणजेच शिवाजी साटम साईबांबाचे भक्त आहेत. ते सांगतात, "मी या स्पर्धेची घोषणा करतो आहे, याचा मला अभिमान वाटतो आहे. या स्पर्धेद्वारे साई बाबांच्या अनुयायांना पवित्र शिर्डीत शताब्दी उत्सव साजरे करण्याची संधी मिळणार आहे. साईबाबांच्या शिकवणुकीमुळे बऱ्याच जणांना स्वतःचा शोध लागला आहे, मार्गदर्शन मिळाले आहे. मी लोकांना विनंती करतो की, या स्पर्धेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. यावर्षी, दसऱ्याला चलो शिर्डी, मेरे साई सोबत एवढेच मी सांगेन "

टॅग्स :मेरे साई मालिकाशिवाजी साटम