Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेघन व मितीलाची अनोखी लव्हस्टोरी

By admin | Updated: January 3, 2016 04:28 IST

निस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच सिनेमाची जान राहिल्या आहेत. चित्रपट कोणत्याही भाषेतील वा प्रांतातील असो, प्रेमकथांना प्रेक्षकांनी नेहमीच प्रतिसाद दिला आहे.

निस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच सिनेमाची जान राहिल्या आहेत. चित्रपट कोणत्याही भाषेतील वा प्रांतातील असो, प्रेमकथांना प्रेक्षकांनी नेहमीच प्रतिसाद दिला आहे. प्रेमाचा अनवट पैलू शोधू पाहणारी कविशा प्रॉडक्शनची ‘चाहतो मी तुला’ ही अनोखी लव्हस्टोरी आहे. नात्यातील हळुवार क्षणांना रेखाटणारा एक फ्रेश चित्रपट ‘चाहतो मी तुला’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून मेघन जाधव व मितीला मिरजकर या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री रूपेरी पडद्यावर रंगणार आहे. प्रेमाला वय, काळाचे भान नसते, असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या मुलाची व मुलीची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटुंबीय समजून घेतात का? त्यांचं प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येईल. भरत शहा प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची, तसेच कथा, पटकथा लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे.चित्रपटातील गीतांना मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. मेघन जाधव, मितीला मिरजकरसह प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.