Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश राजची पहिली पत्नी आहे ही अभिनेत्री, लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला ठोकला होता रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 10:09 IST

प्रकाश राजची पूर्व पत्नी ही एक अभिनेत्री असून तिने त्याच्याशी लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला होता.

ठळक मुद्देप्रकाश राजचे लग्न ललिता कुमारी या अभिनेत्रीसोबत झाले होते. ललिता ही एक तमीळ अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना तीन मुलं असून 1994 मध्ये त्यांनी लग्न केले होते. पण 2004 मध्ये त्यांच्या मुलाचे निधन झाले.

प्रकाश राजने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या खलनायक अंदाजाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्याने आता एखाद्या नायकापेक्षाही एक चांगले काम केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्याच्याच नावाची चर्चा रंगली आहे. प्रकाश राज हा एक अभिनेता असण्यासोबतच एक निर्माता आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मे महिन्यापर्यंतचा पगार आधीच दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रकाश राजचे प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. त्याने केलेले हे काम कौतुकास्पद असून सगळ्या कलाकारांनी त्याचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या संपूर्ण स्टाफला सुट्टी देखील दिली आहे.

प्रकाश राजविषयी आम्ही तुम्हाला आज काही खास गोष्टी सांगणार आहोत. प्रकाश राज गेल्या अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी त्याच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. त्याची पूर्व पत्नी ही एक अभिनेत्री असून तिने त्याच्याशी लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला होता.

प्रकाश राजचे लग्न ललिता कुमारी या अभिनेत्रीसोबत झाले होते. ललिता ही एक तमीळ अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना तीन मुलं असून 1994 मध्ये त्यांनी लग्न केले होते. पण 2004 मध्ये त्यांच्या मुलाचे निधन झाले. तेव्हापासूनच त्यांच्या नात्यात चढ-उतार यायला लागले. त्यांनी 2009 मध्ये एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2010 मध्ये कोरिओग्राफर पोनी वर्मा सोबत प्रकाश राजने लग्न केले. पोनी वर्मा ही दिसायला अतिशय सुंदर असून तिचे फोटो आपल्याला प्रकाश राजच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

प्रकाश राज आणि ललिता यांच्या घटस्फोटानंतर देखील ललिता अभिनयक्षेत्रात परतली नाही. त्या दोघांचा घटस्फोट झाला असला तरी ललिता आजही दोन्ही मुलांच्या संपर्कात असून प्रकाश राजच्या आईसोबत देखील तिचे संबंध खूपच चांगले आहेत.  

टॅग्स :प्रकाश राज