Join us
Daily Top 2Weekly Top 5

मीरामुळे मला वाटते सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 03:30 IST

शाहिद आणि मीरा राजपूत हे नुकतेच एका सुंदर मुलीचे आई-बाबा झाले आहेत. शाहिदने मीराच्या प्रसूतिनंतर चार ते पाच दिवसांतच बाळासह घरी आणले.

शाहिद आणि मीरा राजपूत हे नुकतेच एका सुंदर मुलीचे आई-बाबा झाले आहेत. शाहिदने मीराच्या प्रसूतिनंतर चार ते पाच दिवसांतच बाळासह घरी आणले. सध्या तो काही दिवसांच्या सुट्टीवर असून, त्याला फक्त मीरा आणि त्याच्या मुलीसोबत राहायचे आहे. तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या मुलीसोबत घालवत आहे. त्याने त्याच्या भावना ट्विटरवर पोस्ट केल्या असून तो म्हणतो, ‘मला मीराजवळ खूपच सुरक्षित वाटते. ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण आम्ही जेव्हा अनेक गोष्टींची चर्चा करतो, तेव्हा ती मला एखाद्या विषयाचे वेगवेगळे पॉइंट्स सांगते. त्या विचारसरणीचा मी आदर करतो. मला जे आवडतात, त्यांचा सहवास मला अधिक सुरक्षित करतो. शेवटी माझ्या लाइफ पार्टनरजवळच मला सुरक्षित वाटणार हेदेखील तितकेच खरे आहे.’