Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्य रक्षक संभाजी हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 20:46 IST

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देया आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे मुख्य भूमिका साकारत आहेत. 

या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. पण आता तिने या मालिकेला रामराम ठोकला असून तिची जागा इशा केसकरने घेतली आहे. रसिकाने मालिका सोडल्यानंतर त्याचा या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटले होते. पण रसिकाच्या एक्झिटनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या सगळ्यात पसंतीची मालिका आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या क्रमांकावर राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरची मुख्य भूमिका आहे. अंजली आता राजकारणात उतरली असून हा ट्रॅक देखील प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. तिसऱ्या स्थानावर चला हवा येऊ द्या आणि चौथ्या स्थानावर झी चित्र गौरव पुरस्कार २०१९ आहेत.

सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्या तुला पाहते रे या मालिकेला पहिल्या पाचमध्ये आपले स्थान बनवता आलेले नाहीये. 

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत.  

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीमाझ्या नवऱ्याची बायकोतुझ्यात जीव रंगलाचला हवा येऊ द्यातुला पाहते रे