Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसिका सुनीलने तिच्या चाहत्यांना दिली गुड न्यूज, कोण आहे हा तरुण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 18:24 IST

रसिकाने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेल्या फोटोत तिच्यासोबत आपल्याला एक तरुण पाहायला मिळत आहे. त्यामुळे ती या मुलाला डेट करतेय का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

ठळक मुद्देरसिकाने या फोटोसोबत एक इंटरेस्टिंग कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, दो हजार एक किस... २०२१ या नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा... २०२० हे अतिशय त्रासदायक वर्षं असलं तरी मी काही कारणांमुळे या वर्षाची नेहमीच ऋणी राहीन...

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला गेल्या काही वर्षात प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या मालिकेतील सगळयाच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्यातही शनाया तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत शनायाच्या भूमिकेत रसिका सुनीलला आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळे तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. 

रसिका सुनील तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट करत करत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण तिने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेल्या फोटोत तिच्यासोबत आपल्याला एक तरुण पाहायला मिळत आहे. त्यामुळे ती या मुलाला डेट करतेय का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

रसिकाने या फोटोसोबत एक इंटरेस्टिंग कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, दो हजार एक किस... २०२१ या नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा... २०२० हे अतिशय त्रासदायक वर्षं असलं तरी मी काही कारणांमुळे या वर्षाची नेहमीच ऋणी राहीन... या वर्षाची मी ऋणी असण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे तू...  तिने या पोस्टमध्ये त्या तरुणाला टॅग केले असून त्याच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस एंजिलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर त्याच्यासोबत आपल्याला रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

रसिका सुनीलच्या या पोस्टवर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत जेनीची भूमिका साकारणाऱ्या शर्मिला राजारामने हार्टचा इमीजी पोस्ट केला आहे. यावरून तर दाल में कुछ काला है अशीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण या सगळ्या चर्चांवर रसिकाने मौन राखणेच पसंत केले आहे. रसिकाने तिच्या चाहत्यांना काहीही सांगितले नसले तरी या फोटोमुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :रसिका सुनिलमाझ्या नवऱ्याची बायको