Join us

मयुरी वाघ- पियुष रानडे अडकले विवाहबंधनात!

By admin | Updated: February 2, 2017 11:03 IST

'अस्मिता'फेम अभिनेत्री मयुरी वाघ व अभिनेता पियुष रानडे नुकतेच विवाहबंधनात अडकले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - 'अस्मिता'फेम अभिनेत्री मयुरी वाघ आणि याच मालिकेत तिचा जोडीदार दाखवण्यात आलेला अभि अर्थात पियुष रानडे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत बडोद्यात त्यांचा शानदार विवाहसोहळा पार पडला. 
'अस्मिता' मालिकेत काम करता करता मयुरी आणि पियुषची ओळख झाली. हळूहळू त्यांची छान मैत्री झावी आणि त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या साखरपुड्याची बातमी 
'लोकमत'नेच सर्वप्रथम तुमच्यासमोर आणली होती. तर मयुरीच्या मेहेंदीचे फोटोही आम्ही तुमच्याशी शेअर केले होते 
सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी  मयुरी-पियुषच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले असून त्या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
(अभिनेत्री मयुरी वाघच्या मेहेंदीचे फोटो पाहिलेत का?)
(VIDEO : अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा)
  
  •